सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी ६ जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय वणी येथे विशेष शैक्षणिक भेट दिली. या सहलीचे आयोजन आदरणीय प्राचार्य सुनील बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना हॉस्पिटलच्या वातावरणाशी परिचित करून देणे आणि ऑपरेशन, आयसीयू, डायलिसिस सेंटरसारख्या महत्त्वाच्या विभागांच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती मिळवणे या भेटीचा मुख्य उद्देश होता. रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये विद्यार्थ्यांना पॅथॉलॉजी, जनरल वॉर्डसह इतर विभागांबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या सैद्धांतिक ज्ञानात व्यावहारिक अंतर्दृष्टीची भर पडली.
विद्यार्थ्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून ओटी, आयसीयू आणि डायलिसिस सेंटरमध्ये चालणाऱ्या प्रक्रियांबद्दल प्रत्यक्ष अनुभव घेतला. प्राचार्य सुनील पवार आणि कॉलेजचे अध्यक्ष प्रदीप बोंगीनवार यांचे या शैक्षणिक भेटीसाठी परवानगी दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी विशेष आभार मानले.
सदर सहलीमुळे विद्यार्थ्यांचे औषधशास्त्रातील ज्ञान अधिक सखोल आणि व्यावहारिक बनले असून, त्यांनी रुग्णालयातील सेवा व प्रक्रिया यांचे महत्व प्रत्यक्ष पाहून अनुभवले.

